मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर केमिकलचा टँकर उलटल्याने मुंबई लेन पूर्ण बंद

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या खाली एक केमिकलच्या टँकर पलटी झाला आहे. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडले व त्याचा हवेशी संपर्क आल्याने ते मेणाप्रमाणे झाले आहे.सदरचे केमिकल रस्त्यावर उतारामुळे लांबवर पसरल्याने मुंबई बाजुकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली असून सर्व वाहने लोणावळा शहरातून जुन्या हायवेवर वळविण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.