उद्धव ठाकरेंनी नाव न घेता नरेंद्र मोदींना मारले ‘हे’ 3 टोमणे

उद्धव ठाकरेंनी मारलेले टोमणे-

१. उद्धव ठाकरे यांच्यावर सतत तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार अशी टीका होते. त्याचा उल्लेख करुन ते म्हणाले, बाबरी मशिदीच्यावेळेस बाळासाहेबांनी तुमच्यापैकी ज्यांना वाचवलं ते तरी त्यांना काय उत्तर देणार आहेत? ज्यावेळेला त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं तेव्हा बाळासाहेब त्यांच्यासोबत राहिले, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. रावणाची तोंड उडवली तरी पिक्चरमध्ये दिसत तसं नवीन तोंड येतं. मग नंतर कळतं रावणाचा जीव बेंबीत आहे. काहींना केंद्रात सरकार मिळालं तरी बेंबीत नाही तर मुंबईमध्ये असतो, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

२. मंत्री नवाब मलिकांवर दाऊदवर कथित संबंधामुळे जे आरोप होत आहेत त्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली की, “केंद्रीय संस्था इतक्या पोकळ झाल्या का? नवाब मलिक मंत्री झाले, दाऊदचे हस्तक, सर्वत्र फिरतायत. ते आधी कसं दिसलं नाही? केंद्राच्या यंत्रणा काय फक्त टाळ्या वाजवा, दिवे लावा एवढंच करतंय? त्यांना या दिव्यात हे कसं दिसलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसेच ओबामांनी कधी ओसामा बिन लादेनच्या नावाने मतं मागितली नाहीत. ओबामांनी पर्वा न करता पाकिस्तानात घुसून ओसामाला मारलं. याला म्हणतात हिंमत. तुम्हीही तसं घुसून दाऊदला मारुन दाखवा, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

३. काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्तींसोबत तुम्ही होता. पण अफजल गुरुला फाशी देऊ नये असं मुफ्ती यांचं म्हणणं होतं. त्यांची मतं कशी होती हे तुम्हाला माहिती होती पण तरीही तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत होता, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसेच मुदस्सर लांबीने देवेंद्र फडणवीसांना हार घातल्याची उद्धव ठाकरे यांनी आठवण केली. असे फोटो अनेक जणांसोबत असतात. माझे फोटो देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्याबरोबरही आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published.