लवकरच इस्रो लाँच करणार चांद्रयान-3

नवी दिल्ली – लवकरच चांद्रयान-3 इस्रो (ISRO) लाँच करणार आहे. यासंदर्भात माहिती देताना इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी सांगितले की, चांद्रयान-3 चे काम वेगाने सुरू आहे. डॉ. के. सिवन यांनी सांगितले की, भारताचे शास्त्रज्ञ भूतकाळातील उणीवांपासून धडा घेत चांद्रयान-3 मोहिमेत परिश्रमपूर्वक काम करत आहेत. आम्हाला यावेळी आमच्या मोहिमेमध्ये यश नक्कीच मिळेल, असेही ते म्हणाले. दरम्यान एक महत्त्वाची माहिती सिवन यांनी दिली असून त्यांनी सांगितले की चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चांद्रयान-3 मिशनमध्ये वापरला जाईल. ते खूप फायदेशीर ठरेल.

#ISRO#Chairman#Chandrayaan#ToThePoint#UPSC2022

Leave a Reply

Your email address will not be published.