“भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, एकत्र येऊन लढायला हवं”, ममता बॅनर्जींचं विरोधी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्र्यांना पत्र

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधात कणखरपणे उभं राहण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. भाजपाकडून सर्व केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. केंद्र सरकार सूडाचं राजकारण करत असून यासाठी सीबीआय, ईडी, आयबी, आयकर विभागासह सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. लोकशाहीसाठी ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचं बॅनर्जी यांनी पत्रात नमूद केलं आहे.

#MamtaBanerjee#BengalAssembly
#WestBengal

Leave a Reply

Your email address will not be published.