IPL 2022 SRH vs RR Live : Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: केन विलियम्सला ( Kane Williamson) ची वादग्रस्त विकेट वगळल्यास आयपीएल २०२२मधील आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) निर्विवाद वर्चस्व गाजवले. संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर RRने सनरायझर्स हैदराबादसमोर ( Sunrisers Hyderabad) विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य ठेवले. पण, त्यानंतर RRचे गोलंदाज युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal), प्रसिद्ध कृष्णा व आर अश्विन यांनी चांगली कामगिरी केली. SRHचा निम्मा संघ ३७ धावांवर माघारी पाठवून RRने विजय पक्का केला आणि नंतरचा खेळ केवळ औपचारिक ठरला. आयपीएल २०२२मध्ये धावांचा बचाव करून विजय मिळवणारा RR हा पहिलाच संघ ठरला.#IPL2022T20MatchSRH#yuzvendrachahal#KaneWilliamson#RajasthanRoyals#RR

Leave a Reply

Your email address will not be published.