मिडीयाला आंदोलन आहे कळलं मग पोलीस यंत्रणेला कसं कळलं नाही ? या सर्व घटनेमध्ये पोलिसांचं देखील अपयश आहे . एसटी कर्मचाऱ्यांना कोणीतरी भडकवलं . हे षडयंत्र कुणी केलं हे शोधून काढणार . एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा अनेकांनी निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. ”या हल्लामागचा सुत्रदार पोलीस शोधत आहेत. या प्रकरणात पोलिस कुठेतरी कमी पडले. पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत वरिष्ठ माहिती घेत आहेत,” असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *