नसे प्रमुख राज ठाकरे हनुमान जयंतीनिमित्त पुण्यात; राज यांच्या हस्ते महाआरती होणार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पुण्यात (Pune) दाखल झाले आहेत. मुंबई, ठाण्यानंतर ते आता पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना काय संदेश देतात, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. मनसेच्या वतीने उद्या (ता. १५ एप्रिल) हनुमान जयंतीनिमित्त पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे यांच्या हस्ते ही महाआरती होणार आहे. तसेच, अजान आणि हनुमान चालिसा वादामुळे पक्षातून बाहेर पडणाऱ्या मुस्लीम कार्यकर्त्यांची राज ठाकरे कशी समजूत घालणार, हेही पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.