प्रियंका चोप्रानं काय ठेवलं आपल्या लेकीचं नाव? जन्मानंतर तीन महिन्यांनी झाला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिला याच वर्षी जानेवारीत कन्यारत्न झालं. सरोगसीद्वारे प्रियंका आणि निक जोनस आई-बाबा झालेत. अद्याप प्रियंकाच्या मुलीचा चेहरा दिसलेला नाही. इतक्या दिवसांपासून प्रियंकाने मुलीचं नावही जगापासून लपवून ठेवलं होतं. पण आता प्रियंकाच्या लेकीच्या नावाचा खुलासा झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंकाने खूप विचारांती मुलीच्या नाव ठरवलं. TMZच्या रिपोर्टनुसार, प्रियंका व निकने त्यांच्या मुलीचं नाव Malti Marie Chopra Jonas असं ठेवलं आहे. TMZने प्रियंकाच्या मुलीच्या जन्माचं प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा केला आहे. या प्रमाणपत्रानुसार, प्रियंकाची लेक मालतीचा जन्म 15 जानेवारीला झाला. कॅलिफोर्नियाच्या San Diego येथे रात्री 8 वाजतानंतर तिने जन्म घेतला. अद्याप या वृत्ताला प्रियंका वा निकने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.