गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानींना रात्री उशिरा अटक

गुवाहटी – गुजरातमधील वडगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. पालनपूर सर्किट हाऊस येथून बुधावारी रात्री 11.30 वाजता अटक करण्यात आली आहे. मेवानी यांच्या एका समर्थकाने यासंदर्भात माहिती दिली. तसेच, पोलिसांनी अद्याप एफआयआरची प्रत आम्हाला दाखवली नाही. केवळ, आसाममध्ये दाखल असलेल्या काही गुन्ह्यांसदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या, असेही त्यांच्या टीममधील कार्यकर्त्याने सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.