नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या, मग…; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

मुंबई – भाजपाचं पोलखोल आणि शिवसेनेचा डब्बागोल अशी अवस्था झाली आहे. भाजपाच्या रथाची तोडफोड करणाऱ्यांना अटक करा. आम्ही कोणाचं नाव घेत नाही. परंतु ज्या संघटनेने हे केले ते पळपुटे आहेत. पोलिसांनी या कटामागचा मास्टर माईंड शोधून काढावा. ज्या आरोपींना पकडले त्यांना कोर्टातून शिक्षा मिळेल परंतु त्यांना मुंबईतून हद्दपार करावं अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार(BJP Ashish Shelar) यांनी केला आहे. भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले की, तुम्ही ५ वर्षात जी मुंबईकरांची फसवणूक केली त्याचा हिशोब घ्या. गेल्या २५ वर्षात विशेषत: मागील ५ वर्षात मुंबईकरांच्या खिशातून घेतलेल्या पैशांचा अपव्यय केला गेला. जे दगडफेक करतायेत. त्यांना एकच सांगतो, तारीख, वेळ तुमची दगडफेकीचं अभियान दोघं मिळून करू. नामर्दासारखं वागू नका. हिंमत असेल समोर या. पोलिसांनी या नामर्दांवर कारवाई करावी. मुंबई पोलिसांच्या कतृत्वाचं यश आम्हाला बघायचं आहे. या कटामागचे मास्टर माईंड कोण आहे हे समोर आले पाहिजे. ज्या आरोपींना पकडले त्यांना मुंबईतून हद्दपार करावं असं त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.