हिंमत असेल तर राष्ट्रपती राजवट लावा, राऊतांचं भाजपला थेट चॅलेज

नागपूर/मुंबई – खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून शिवसैनिकांनीही जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. आता सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याने स्पष्ट केले. त्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले असून आज सकाळपासूनच राणा कुटुंबीयांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. येथे शिवसैनिक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे. याप्रकरणी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.