घरीच केली पूजा, राणा दाम्पत्याची आज माघार; मातोश्रीवर उद्या जाणार?

मुंबई – खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून शिवसैनिकांनीही जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. आता सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याने स्पष्ट केले होते. त्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले असून आज सकाळपासूनच राणा कुटुंबीयांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. येथे शिवसैनिक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे. त्यानंतर, राणा दाम्पत्याने आज माघार घेतल्याचं समजत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.