वन समिती परिषद : शहा यांनी शिवराज सिंहांची मुक्तकंठाने केली प्रशंसा, आदिवासींना दिले जमिनीचे हक्क

भोपाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आठ तासांच्या भोपाळ दौऱ्यात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची जाहीर प्रशंसा करण्यासोबतच आदिवासी समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करून जवळपास निवडणुकीचीच घोषणा केली. मध्य प्रदेशातील ८२७ वन गावांना महसुली गावांचा दर्जा देऊन दोन कोटी आदिवासींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या गावांत राहण्याचा अधिकाराचा लाभ मिळणार आहे. वन समित्यांच्या परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला तेंदूची पाने गोळा करणारे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्य प्रदेशातील तेंदूची पाने गोळा करणाऱ्यांची संख्या ३५ लाख असून यात प्रामुख्याने महिला आहेत.