इंधनावरील कर आधी केंद्र सरकारने कमी करावा . प्रत्येक वेळी हा चेंडू राज्याकडे ढकलू नये

पेट्रोल- डिझेलवरील कर कमी करण्यावरून राज्य सरकार आणि केंद्रामध्ये कालपासून सुरू झालेले घमासान आज दुसऱ्यादिवशीही सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याकडून इंधनावरील टॅक्स कमी करण्याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले.

परदेशातून इंधन आयात झाल्यानंतर सर्वात आधी केंद्र सरकारकडून त्यावर टॅक्स लावला जातो. त्यामुळे इंधनावरील कर आधी केंद्र सरकारने कमी करावा. प्रत्येक वेळी हा चेंडू राज्याकडे ढकलू नये, असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *